Direct Finance Scheme | MPBCDC

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाची रु. १,००,००० ची थेट कर्ज योजना

ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज स्वीकारण्याची तारीख दिनांक ७ जानेवारी २०१९ पासून
२५ जानेवारी २०१९ पर्यंत कार्यालयीन वेळेत.

फक्त अनुसूचित जाती व नवबौध्द समाजातील व्यक्तीं साठी (Only for Scheduled Caste & Nauboudha)

अर्जदाराने ऑनलाईन अर्ज दाखल केल्यानंतर त्याची एक *. PDF फॉरमॅट मध्ये फाईल बनेल. सदर फाईलची प्रिंटाऊट व
खाली नमूद अ), ब), क), ड) मधील कागदपत्रांच्या सत्य व छायांकित प्रती विहित कालावधीत व्यक्तिशः जिल्हा कार्यालयात दाखल करावेत.

अ) अर्जदाराची वैयक्तिक माहितीची कागदपत्रे (सदर कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य आहे.)
१. जात प्रमाणपत्र २. उत्पन्नाचा दाखला
३. आधार कार्ड ची प्रत ४. पॅन कार्ड ची प्रत (अनिवार्य नाही)
५. शिधापत्रिकेची प्रत (पुढील व माघील बाजू) ६. कर्ज परतफेडीचे शपथपत्र (विहित नमुन्यातील)
७. अधिकृत विक्रेत्याचे दरपत्रक
ब) व्यवसाय संबंधीचे कागदपत्रे:
१. व्यवसायाचा प्रकल्प अहवाल (स्वताः तयार केलेला) २. प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र, असल्यास त्याची प्रत
३. व्यवसायाचे अनिवार्यते नुसार लायसन्स (असल्यास) ४. व्यवसायाच्या जागेचा पुरावा (स्वतःची /भाडेतत्त्वावरील)
क)जामीनदारांची कागदपत्रे:
१. जामीनदार १ चा आधार कार्ड २. जामीनदार १ चा पॅन कार्ड
३. जामीनदार १ चे हमीपत्र (विहित नमुन्यातील)
४. जामीनदार २ चा आधार कार्ड ५. जामीनदार २ चा पॅन कार्ड
६. जामीनदार २ चे हमीपत्र (विहित नमुन्यातील)
ड) साक्षीदारांची कागदपत्रे:
१. साक्षीदार चा आधार कार्ड २. साक्षीदार चा पॅन कार्ड





टिप :-

१. " * " चिन्ह असलेले रकाने भरणे अनिवार्य आहे.
२. ऑनलाईन पद्धतीने अर्ज पुर्ण भरता आला नाही तर उपलब्ध विहित नमुन्यात मुदत कालावधीत महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात अर्ज व कागदपत्रे दाखल करता येतील.
३. वैयक्तिक माहितीची संपुर्ण कागदपत्रांच्या प्रति पात्रतेसाठी आवश्यक आहेत.
४. ऑनलाईन / ऑफलाईन अर्ज भरण्याची तारीख वाढवण्यात येणार नाही *.
५. कागदपत्रांच्या प्रति स्वसाक्षांकित स्वंय प्रमाणित केलेल्या असाव्यात..

डाउनलोड :- विहित नमुने


ऑनलाईन अर्ज कसा करावा त्याबाबत चा विडिओ :-